मोठी बातमी! एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ; अनिल परब यांची घोषणा

मुंबई : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण आणि सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी एसटी कामगारांनी सुरू केलेल्या संपावर आज तोडगा निघाला आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषतद घेऊन एसटी कामगारांच्या पगारवाढीची घोषणा केली. एसटीच्या इतिहासातील ही सर्वाधिक वाढ असल्याचं त्यांनी सांगितलं. अनिल परब यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली.

यावेळी मंत्री उदय सामंत, भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत उपस्थित होते. आम्ही सरकारतर्फे एक प्रस्ताव ठेवला. विलीनीकरणाचा निर्णय समितीने सरकारडे दिला तर तो मान्य असेल. पण तो निर्णय येईपर्यंत किंबहूना निर्णय होईपर्यंत तिढा असाच ठेवता येणार नाही. त्यामुळे सरकारने कामगारांच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मुळ पगारात वाढ वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

जे कर्मचारी 1 वर्ष ते 10 वर्ष कर्मचारी आहेत. त्यांच्या मुळ पगारात 5 हजाराची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. एसटीच्या इतिहासातील ही मोठी वाढ असल्याचं अनिल परब यांनी सांगितलं आहे. जे कर्मचारी 10 ते 20 वर्षाचे कर्मचारी आहेत, त्यांना 4 हजार रूपये वेतनवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 20 वर्षांपेक्षा जास्त कर्मचारी आहेत, त्यांच्या वेतनमध्ये 2500 रूपयांची वाढ होणार आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांच्या पगारात 41 टक्क्यांची वाढ झाली आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा