मोठी बातमी : कंगना रणौतला सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी

मुंबई : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणौतला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचं समोर आलं आहे. सोशल मीडियावरून कंगनाला तशी धमकी देण्यात आली आहे. कंगणाने याप्रकरणी पोलीसात तक्रार दाखल केली असून, धमकी देणाऱ्याविरोधात फिर्याद नोंदवली आहे.

याबाबत कुल्लूचे पोलीस अधिक्षक गुरदेव शर्मा यांनी माहिती देताना सांगितले की, “कंगना रणौतने मनाली पोलीस स्टेशनमध्ये एक तक्रारपत्र दिले आहे, ज्यामध्ये तिने लिहिले की, सोशल मीडियावर एका व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. पोलिसांनी कलम २९५ ए, ५०४, ५०५,५०६,५०९ आयपीसी अंतर्गत प्रकरण प्रविष्ट केले आहे.”

दरम्यान, शीखांसदर्भातील वादग्रस्त वक्तव्यावरून कंगना रणौतच्या अडचणीत वाढ झालीय. आम आदमी पक्षाचे आमदार आणि दिल्ली विधानसभेच्या शांतता आणि सद्भावना समितीचे अध्यक्ष राघव चड्डा यांनी कंगनाला समन्स पाठवलं आहे. त्यामुळे या प्रकरणात कंगनाला ६ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता समितीसमोर हजर राहावे लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा