मोठी बातमी : किरीट सोमय्या यांनाच न्यायालयाचा दणका; ‘या’ प्रकरणात न्यायालयात हजर राहावं लागणार

मुंबई : भाजपचे फायर ब्रँड नेते किरीट सोमय्या यांनी सत्ताधारी पक्ष महाविकास आघाडीतील नेत्यांवरील भ्रष्ट्राचाराचे आरोप करत पुरावे मिळवण्यासाठी धाडसत्र सुरु केलंय. यावेळी त्यांनी आता पुन्हा एकदा ठाकरे सरकारला अडचणीत आणणारा दावा केला आहे. अनिल देशमुख, अनिल परब यांच्यानंतर आता सोमय्यांनी राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप लावलेत.

सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी अर्थ या एनजीओवरदेखील गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. याच आरोपांबाबत सोमय्या यांना शिवडी न्यायालयाने समन्स बजावले असून येत्या 5 ऑक्टोबर रोजी त्यांना न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. मुंबईतील शिवडीच्या मेट्रोपाॅलिटन मॅजिस्ट्रेट न्यायालयाने सोमय्या यांचे कान टोचले आहेत. किरीट सोमय्यांनी 1 एप्रिलला गृहनिर्माण विभागाचे अधिकारी प्रविण कलमे यांच्यावर आरोप केला होता. प्रविण कलमे गृहनिर्माण विभागाचे सचिन वाझे आहेत, असं सोमय्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर प्रविण कलमे यांनी किरीट सोमय्यांवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता.

या आरोपांना आव्हान देत प्रवीण कलमे आणि अर्थ या स्वयंसेवी संस्थेने न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. ही याचिका दाखल करून घेण्यात आली असून त्यावर सुनावणी सुरु आहे. त्यामुळे सोमय्या यांना येणाऱ्या 22 सप्टेंबर आणि 5 ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजेरी लावावी लागणार आहे. एवढेच नाही तर केलेले आरोप सिद्ध करण्यासाठी सोमय्या यांना खटाटोप करावा लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या

 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा