मोठी बातमी ; ममता बॅनर्जीचा भाजपला जोरदार धक्का ; तब्बल ३३ आमदार तृणमूल काँग्रेसच्या वाटेवर

मुंबई : पश्चिम बंगालमधील वेगवान राजकीय घडामोडीना वेग आला आहे . विधानसभा निवडणुकीआधी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमधून अनेक नेते आणि आमदार भारतीय जनता पक्षात गेले. तृणमूलनं तब्बल २०० हून जास्त जागा मिळवत सत्ता राखल्यानंतर आता भाजपला ओहोटी लागण्याची चिन्हं आहेत.

भाजपचे ३३ आमदार तृणमूलच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. सुवेंदू अधिकारी यांच्यासह तृणमूलच्या बड्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीआधी कमळ हाती घेतलं. सुवेंदू यांनी ममता बॅनर्जी यांचा पराभवदेखील केला. मात्र ममता यांनी राज्याची सत्ता राखली. त्यामुळे आता भाजपमध्ये गेलेले तृणमूलचे अनेक नेते घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत.

तब्बल ३३ आमदार तृणमूलमध्ये परतणार असल्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे निवडणुकीपूर्वी तृणमूलचे ३३ आमदार भाजपमध्ये गेले होते. आता तितकेच आमदार पुन्हा तृणमूलमध्ये येऊ शकतात. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष असलेले मुकूल रॉयदेखील तृणमूलमध्ये घरवापसी करू शकतात.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा