मोठी बातमी : मराठा आरक्षण रद्द; सर्वोच्च न्यायालयाने दिला मोठा निर्णय!

नवी दिल्ली : आज (५ मे) मराठा समाजासाठी महत्वाचा दिवस आहे. गेल्या ६ वर्षांपासून राज्याचं राजकारण मराठा आरक्षणाभोवती फिरत आहे. प्रत्येक पक्ष आपण मराठा समाजासोबत असल्याचं सांगत आहे. त्यातच आता प्रकरण न्यायालयाच्या पारड्यात गेल्यानं न्यायालय काय निकाल देईल? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. देशाच्या सर्वात मोठ्या न्यायालयात या प्रकरणी आज अंतिम सुनावणी होणार होती.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केलं असून महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाला असंवैधानिक असल्याचं म्हटलं आहे. तसेच 50 टक्केहून अधिक आरक्षण समाजाला देता येत नाही. यासोबतच मराठा समाजाला आरक्षणाच्या श्रेणीत आणण्यासाठी शैक्षणिक आणि समाजिकरित्या मागासवर्गीय समुदाय असल्याचं घोषित करता येत नाही, असंही कोर्टानं स्पष्ट केलं आहे.

यासंबंधी न्यायमूर्ती भूषण यांनी मराठा आरक्षण कायदा सर्वोच्च न्यायालयातर्फे रद्द करण्यात आल्याचा मोठा निर्णय आज दिला आहे. तसेच 50 टक्क्यांच्यावर दिलं गेलेलं मराठा आरक्षण अवैध असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान आज स्पष्ट केलं आहे. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणाच्या बाजूने निकाल लागेल, अशी आशा व्यक्त केली होती. मात्र न्यायालयातून आता वेगळाच निर्णय समोर आल्याचं दिसून येत आहे. या सर्व प्रकरणात मराठा समाज नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.