मोठी बातमी! नाना पटोले आणि बाळासाहेब थोरातांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घटना घडत आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी ही भेट झाली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. काँग्रेस नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे.

दिवंगत नेते राजीव सातव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर होत असलेल्या निवडणुकीत भाजपने दिलेला उमेदवार मागे घेण्याची विनंती थोरात आणि पटोले यांनी फडणवीसांकडे केली. त्यामुळे भाजप काँग्रेसच्या विनंतीला मान देऊन संजय उपाध्याय यांचा अर्ज मागे घेणार का, याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. एखाद्या राजकीय नेत्याच्या निधनानंतर त्याच्या जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीत सहसा विरोधी पक्ष आपला उमेदवार देत नाही. त्यामुळेच यावेळी सुद्धा भाजपने आपला उमेदवार मागे घेत राज्यसभेची पोटनिवडणूक बनविरोध व्हावी यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा