मोठी बातमी! राज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई : अश्लील चित्रपट प्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि उद्योजग राज कुंद्राच्या अडचणीत वाढ झाली आहे. राज कुंद्रा याला अश्लील व्हिडीओ बनवणे आणि अपलोड करणे प्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. राज कुंद्राला अटक झाल्यापासून सगळीकडे त्याला ट्रोल केलं जात आहे. यातच राज कुंद्राच्या अडचणीत वाढ झाल्याचं समोर येत आहे.

राज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. रायन थॉर्पच्याही न्यायालयीन कोठडीतही वाढ करण्यात आली आहे. पॉर्नोग्राफी कनेक्शन समोर आल्यापासून राज कुंद्रा वादाच्या भोवऱ्यात अडकला. पॉर्नोग्राफी प्रकरणी रोज नवे खुलासा समोर येत आहे. आता राज कुंद्रा पॉर्नोग्राफी कनेक्शन प्रकरणी पोलिसांचा तपास सुरूचं आहे.

दरम्यान, मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचनं या प्रकरणाचा साडेपाच महिने कसून तपास केला, अनेकांची चौकशी केली, त्यानंतर एकेक गोष्टींचा तपास केला. त्यातून या सगळ्याचा मास्टर माईंड हा राज कुंद्रा असल्याचं समोर आलं. अजून याप्रकरणात काय काय समोर येतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा