मोठी बातमी : शाहरूख खानच्या अडचणी वाढल्या! आर्यनने ड्रग्जचं सेवन केलं असल्याचं दिली कबूली

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला रेव्ह पार्टी प्रकरणी नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरो अर्थान एनसीबीनं अटक केली आहे. त्याला नक्की कोणत्या कारणासाठी अटक करण्यात आली याची माहिती एनसीबीनं दिली आहे. आर्यनच्या अरेस्ट मेमोमध्ये याचा संपूर्ण तपशील देण्यात आला आहे. विशेष म्हणजे आर्यनने स्वत: आपल्या लेन्सच्या डब्ब्यातून ड्रग्ज नेल्याची कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आर्यन खानसह आठ जणांना एनसीबीने ताब्यात घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये अरबाझ मर्चंट, मूनमून धमेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर आणि गोमित चोप्रा यांचा समावेश आहे. एनसीबीने रात्रभर या सगळ्यांची कसून चौकशी करुन त्यांचे जबाब नोंदवले आहेत. आता थोड्याचवेळात या सगळ्यांवर गुन्हे दाखल करुन त्यांना करण्यात आलीय.

एनसीबीच्या माहितीनुसार आर्यन खानने मान्य केलं आहे की, तो या पार्टीचा एक भाग होता. तसेच आर्यनने आपण चूक केल्याची कबूलीही दिली आहे. तसेच माहितीनुसार आर्यनने ड्रग्जचं सेवन केलं असल्याचं कबूल केलं आहे. तसेच अभिनेता शाहरूख खानने आपल्या मुलाच्या सुटकेसाठी प्रसिद्ध वकील सतीश मानशिंदे यांच्याशी संपर्क केला आहे.

आर्यन सध्या एनसीबी कोठडीत असून शाहरुख व कुटुंबीयांसाठी हा सर्वात कठीण काळ मानला जात आहे. मुलावरील कारवाईनंतर शाहरुखने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी त्याच्यावरील तणाव स्पष्टपणे दिसत आहे. आर्यनला किला कोर्टाने एका दिवसाची कोठडी सुनावली असून त्याच्या जामिनासाठी लगेचच अर्जही करण्यात आला आहे. सोमवारी या अर्जावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या

 

 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा