मोठी बातमी : युगांडात भारतीय खेळाडू थांबलेल्या हॉटेलबाहेर दोन बॉम्बस्फोट

युगांडा : भारतीय पॅरा-बॅडमिंटन टीम युगांडा पॅरा-बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी युगांडा येथे उपस्थित आहे. भारतीय संघ ज्या हॉटेलमध्ये थांबला आहे तेथून फक्त १०० मीटर अंतरावरच दोन बॉम्बस्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान भारतीय खेळाडू हॉटेलमध्ये सुरक्षित असल्याची माहिती भारतीय पॅरा-बॅडमिंटनने दिली आहे.

टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा प्रमोद भगतदेखील युगांडात आहे. त्याच्यासोबत मानसी जोशी आणि मनोज सरकार हे खेळाडू स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उपस्थित आहेत. टोक्या पॅरालिम्पिकमध्ये भारतीय संघाचे प्रशिक्षक असणारे गौरव खन्नादेखील संघासोबत आहेत.

“येथे बॉम्बस्फोट झाला असून आम्ही सुरक्षित आहोत. काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही. आमच्या वेळापत्रकात कोणताही बदल झालेला नाही. थोडा गोंधळ उडाला होता, पण सर्वजण सुरक्षित आहेत. स्पर्धा ठरल्याप्रमाणे पार पडणार आहे,” अशी माहिती प्रमोद भगतने एका वृत्तसंस्थेशी बोलताना दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा