मोठी बातमी! विराट कोहलीने सोडणार भारतीय संघाचं कर्णधारपद

मुंबई : टी ट्वेण्टी वर्ल्ड कप तोंडावर असताना टीम इंडियात मोठ्या घडामोडी सुरु आहेत. कारण कर्णधार विराट कोहली टी ट्वेण्टीच्या कर्णधारपदावरुन पायउतार होणार आहे. विराट कोहलीने सोशल मीडियावर पोस्ट टाकून याबाबतची घोषणा केली. विराट कोहली केवळ टी ट्वेण्टीची कॅप्टन्सी सोडणार आहे. तो वन डे आणि कसोटी फॉरमॅटमध्ये कर्णधारपदी कायम असेल.

दोनच दिवसापूर्वी विराट कोहली कर्णधारपद सोडणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्या अखेर खऱ्या ठरल्या आहेत. मी तसा पुरेसा नशिबवान आहे की, मला फक्त भारताचं प्रतिनिधीत्वच करायला मिळालं असं नाही तर टीम इंडियाला पूर्ण क्षमतेसह लीडही करता आलं. भारताचा कर्णधार होण्यापर्यंतच्या प्रवासात ज्यांनी मला सपोर्ट केला त्या प्रत्येकाचे मी आभार मानतो.

तसेच त्यांच्याशिवाय मला हे करता येणं शक्य नव्हतं. त्या प्रत्येकाचे म्हणजे टीममधले सहकारी, सपोर्ट स्टाफ, निवड समिती, माझे कोचेस, तसच प्रत्यक भारतीय क्रिकेटप्रेमीचे ज्यांनी आमच्या विजयासाठी प्रार्थना केली त्यांचेही आभार, असं कोहली कर्णधारपद सोडताना म्हणाला. कामाचा ताण समजून घेणं ही एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि गेल्या 8-9 वर्षांत प्रचंड कामाचा ताण सर्व 3 फॉर्मेट खेळत आहे आणि गेली 5-6 वर्षे नियमितपणे कर्णधारपदाची कामगिरी पार पाडली, आता मला वाटते की मला स्वतःला जागा देण्याची गरज आहे, असं विराट कोहलीने म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा