मोठी बातमी : राज्यात मराठा आंदोलन आक्रमक होत असतानाच मुंबईमध्ये पुन्हा जमावबंदी!

मुंबई : देशात आता अनलॉक-४ लागू करण्यात आला आहे. मात्र वाढती रुग्णसंख्या चिंतेची बाब बनली आहे. गेले काही दिवस देशात नव्या कोरोनाबाधितांचा आकडा हा ९० हजार पार गेला असून गेल्या २४ तासात उच्चांकी ९७ हजार रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असून आंदोलनासह निदर्शनं केली जात आहेत.

दुसऱ्याबाजूला सुरुवातीला मुंबईमध्ये हाहाकार माजवणारा कोरोना काहीसा आटोक्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. तर, केंद्र सरकारने देशात पुन्हा लॉकडाऊन होणार नाही असे देखील स्पष्ट केले गेले होते. सद्या मुंबईमध्ये कोरोना परिस्थिती हाताबाहेर जात असून मुंबईकरांसाठी आता महत्वाची बातमी हाती येत आहे.

मुंबईत 18 (आज मध्यरात्री) सप्टेंबरपासून कलम 144 लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून या संदर्भात आदेश काढण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवासासह एकत्र येण्यावर निर्बंध आले आहेत. मुंबईत 30 सप्टेंबरपर्यंत जमावबंदी लागू राहणार आहे.

दरम्यान, मराठा आरक्षण, शिक्षकांचे प्रश्न, दूधदरवाढ, कांदा निर्यातबंदी अशा विविध विषयांवर राजकीय आंदोलने राज्यात जोर धरत असून राजधानी मुंबईमध्ये देखील आंदोलनाचे सत्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेवर ताण येत असल्याचे कारणही या संचारबंदीमागे असल्याचे बोलले जाते.

काय असतील नियम?

अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांना या दरम्यान प्रवासाची मुभा असणार आहे. मात्र, त्यांना देखील फिजिकल डिस्टन्स ठेवणे, कमीत कमी सहा फुटांचे अंतर ठेवणे गरजेचे असल्याचं म्हटलं आहे. केवळ अत्यावश्यक काम असेल तरचं घराबाहेर पडावे. घराबाहेर फिरताना चेहऱ्यावर मास्क अनिवार्य आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.

मोठी बातमी : राज्यात मराठा आंदोलन आक्रमक होत असतानाच मुंबईमध्ये पुन्हा जमावबंदी! Screenshot 2020 09 17 at 9.36.16 PM

 

मोठी बातमी : राज्यात मराठा आंदोलन आक्रमक होत असतानाच मुंबईमध्ये पुन्हा जमावबंदी! Screenshot 2020 09 17 at 9.36.27 PM

 

महत्वाच्या बातम्या :-

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा