पुरुषोत्तम खेडेकरांच्या युतीच्या भूमिकेवर भाजपकडून मोठी प्रतिक्रिया!

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपविरोधात शड्डू ठोकणारे मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, यांच्या लेखाने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. आगामी निवडणुकांसाठी त्यांनी चक्क भाजपसोबत युती करणे हाच एकमेव पर्याय असल्याचे म्हटले आहे. मराठा सेवा संघाच्या ३२व्या वर्धापन दिनानिमित्त लिहिलेल्या लेखात पुरुषोत्तम खेडेकर यांनी आपली भूमिका व्यक्त केली. त्यामुळे मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड हे आता भाजपसोबत युती करण्यासाठी सकारात्मक असल्याचे बोलले जात आहे.

यानंतर यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिलीय. पुरुषोत्तम खेडेकर यांनी मुखपत्रातून त्यांची इच्छा व्यक्त केली आहे. भाजपकडून असा कोणताही अद्यापपर्यंत निर्णय नाही. त्यांची ऑफर काय आहे हे बघूनच हा सगळा निर्णय घेतला जाईल, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.

संभाजी ब्रिगेडने असं वक्तव केलं असेल तर त्याचं स्वागतच असेल. महाविकास आघाडीला आरक्षण राखता आलं नाही हे मराठा समाजातील लोकांना समजलं आहे. निवडणुका लढावाव्या की नाही हे वरच्या पातळीवर निर्णय घेतील. मराठा समाजातील अजून किती बळी या सरकारला हवे आहेत हा माझा प्रश्न आहे. सरकारला जाग येत नसेल तर दुर्दैव आहे, असं प्रविण दरेकर म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा