InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात मिळणार मोठा दिलासा…

देशातल्या शेतकऱ्यांनी कमाल केली असून त्यांनी विक्रमी अन्नधान्य पिकवलंय, पण अतिरिक्त झालेल्या अन्नधान्यामुळंच देशात शेतमालाच्या बाजारात मंदी आलीय. त्यामुळे येत्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे संकेत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिले आहे.

ते म्हणाले, “दुष्काळ आणि अतिरिक्त उत्पादन या दोन्ही संकटांमुळं सध्या देशातला शेतकरी संकटात सापडलाय, त्याला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. उत्पादन जास्त झाल्याने मालाचे भाव कोसळले. त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसला.”

येत्या बजेटमध्ये शेतकऱ्यांना मदत होईल अशा मोठ्या घोषणेचे संकेत यावेळी जेटलींनी बोलताना दिले. बजेटमध्ये शेतकऱ्यांना खास महत्व दिलं जाणार असल्यांचही त्यांनी स्पष्ट केलं. तेलंगणाच्या धर्तीवर सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात मदत म्हणून थेट पैसे जमा करण्याच्या योजनेवर विचार करत आहे.

महत्वाच्या बातम्या –

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.