InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

भारताला मोठा धक्का; रोहित आणि कोहली बाद

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना पावसामुळे राखीव दिवशी म्हणजेच आज खेळवण्यात आला. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 46.1 षटकांत 5 बाद 211 धावा केल्या. त्यानंतर पावसानेच दमदार बॅटींग केली.

बराच वेळ वाट पाहूनही पावसाचा जोर कायम राहिल्याने अखेरीस उपांत्य फेरीचा सामना राखीव दिवशी खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. आज 46.1 षटकापासूनच सामन्याला सुरुवात झाली. न्यूझीलंडने भारतासमोर 240 धावांचे लक्ष्य ठेवले

सामन्याच्या दुसऱ्याच षटकात भारताचा सलामीवीर रोहित शर्मा बाद झाला. मॅट हेन्रीनं त्याला झेलबाद करून माघारी पाठवले. त्यानंतर आता भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीही बाद झाला आहे. त्यामुळे भारताला खूप मोठा धक्का बसला आहे.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply