‘बिग बाॅस 14’ विजेती रुबीना दिलैक मोठ्या पडद्यावर झलकण्यास झाली सज्ज

मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘बिग बाॅस’मध्ये प्रत्येक सिझनला काही ना काही नवीन पाहायला मिळते. तसेच गेल्या वर्षी ‘बिग बाॅस 14’ सीझनची विजेती राहिलेली अभिनेत्री रुबीना दिलैक तुफान चर्चेत आली होती. अशातच पून्हा एकदा ती चर्चेचा विषय ठरत आहे. याचे कारण म्हणजे लवकरच ती बॉलीवूड मध्ये पदार्पण करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

छोड्या पडद्यावर रुबीना प्रचंड लोकप्रिय आहे. तिचे अनेक चाहते आहेत. आता ती मोठा पडदाही गाजवण्यासाठी सज्ज आहे. तिला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी तिचे चाहतेही भरपूर उत्सूक असल्याचं पाहायला मिळत आहे. ती लवकरच ‘अर्ध’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.

दरम्यान, रुबीनासोबत या चित्रपटात ‘पवित्र रिश्ता’ फेम अभिनेता हितेन तेजवानी आणि कॉमेडियन राजपाल यादव देखील प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण सप्टेंबर महिन्यात सुरू होणार असून हा पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आता रुबीनाला मोठ्या प़डद्यावर भूमिका साकारताना पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा