सनी लिओनीसोबत रोमान्स करताना दिसणार Bigg bossचा ‘हा’ स्पर्धक !

बिग बॉसच्या या सीझनमध्ये बरेच वाद-विवाद आणि भांडणं पाहायला मिळाली. या सीझनमध्ये अनेक टीव्ही , चित्रपट स्टार्स आपल्याला पाहायला मिळाले. त्यांची भांडणे आणि वादविवाद यामुळे या शोला चांगलीच रंगत येत होती. यातील अनेक चेहरे ओळखीचे  होते तर काही  अनोळखी . मात्र यंदाच्या सीझनमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिले ते असिम रियाज आणि सिद्धार्थ शुक्ला.या शोमध्ये येण्याआधी आसिमला फारसं कोणी ओळखत नव्हतं मात्र आता त्याचे लाखो-करोडो चाहते आहेत.त्याच्या चाहत्यांसाठी एक खूशखबर आहे ती म्हणजे,बॉलिवूड दिग्दर्शक महेश भट आसिमला लॉन्च करण्याची शक्यता आहे.

CAA मध्ये बदल होण्याबाबतचे रामदास आठवले यांनी दिले संकेत !

मिळालेल्या माहितीनुसार,  बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर आसिम सनी लिओनीसोबत एका सिनेमात काम करताना दिसणार आहे.या प्रोजेक्टची कोणतीही ऑफिशिअल अनाउन्समेंट अद्याप झालेली नाही किंवा महेश भट किंवा सनी लिओनी यापैकी कोणीही याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.सनी लिओनी आणि आसिम रियाज काही दिवसांपूर्वीच बिग बॉसच्या घरात भेटले होते. यावेळी ती तिचा सिनेमा ‘रागिनी एमएमएस रिटर्न्स’च्या प्रमोशनसाठी आली होती.

Loading...

मशिदीवरील भोंग्यांचा त्रास आताच कसा झाला? जलील यांचा राज ना सवाल 

बिग बॉस शोबद्दल बोलायचं तर या सीझनचा फिनाले एपिसोड लवकरच प्रसारित होणार आहे. दरम्यान फिनालेच्या अगोदरच घरातील वाद विकोपाला गेलेले दिसत आहे.

 

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.