Bigg Boss Marathi 4 Promo । ‘बिग बॉस’च्या चाहत्यांसाठी खुशखबर; महेश मांजरेकरच करणार सूत्रसंचालन

महाराष्ट्र देशा डेस्क : बिग बॉस या शोची लोकप्रियता तुफान आहे. हा शो वर्षभर येणाऱ्या सर्व मालिका आणि कार्यक्रमांपैकी सर्वाधिक पाहिला जाणारा म्हणजेच सर्वात जास्त टीआरपी असणारा शो आहे. टीव्हीबरोबरच हा शो ओटीटी प्लॅटफॉर्मवरही मोठ्या प्रमाणात पाहिला जातो. त्यातही बिग बॉस मराठीचे तर करोडो चाहते आहेत. जे या शोच्या चौथ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. बिग बॉस मराठी हा शो जितका त्यात सहभागी होणाऱ्या कलाकार स्पर्धकांमुळे लोकप्रिय ठरतो त्याहूनही जास्त लोकप्रियता शोचे सूत्रसंचालक प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची आहे. त्यातच काही दिवसांपूर्वीपासून शोचा चौथा सिजन महेश मांजरेकर होस्ट करणार नाहीत, अशा बातम्या येत होत्या. त्यामुळे अनेक चाहते नाराज झाले होते. पण त्याच चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे बिग बॉस मराठीचा चौथा सिजनही महेश मांजरेकरच होस्ट करणार आहेत.

महेश मांजरेकर हे दरवर्षी नव्या सिजनची घोषणा आपल्या सोशल मीडिया हॅन्डलवर प्रोमो शेयर करून करतात. मात्र या वर्षी त्यांनी प्रोमो न शेयर केल्यामुळे हा ते यावर्षी सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार नाहीत अशा शक्यता वर्तवल्या जात होत्या. मात्र नुकताच त्यांनी या चौथ्या सिजनचा प्रोमो शेयर केला आहे. ज्याला चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळत आहे. “खेळाडू नवे, घर नवे आणि होस्ट… वर्गात विद्यार्थी नवीन असतात पण मास्तर तोच असतो… महेश वामन मांजरेकर! यावर्षी जरा वेगळी ‘शाळा’ घेऊया.” असा डायलॉग हा प्रोमोमध्ये ऐकायला मिळत आहे. या प्रोमोवर नेटकऱ्यांनी तुफान लाईक्स आणि कॉमेंट्स केल्या आहेत.

तर दरवर्षी प्रमाणे या वर्षीही महेश मांजरेकरांचा एक वेगळाच लुक पाहायला मिळत आहेत. दरम्यान या सिजनमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची नावे समोर येत आहेत. झी मराठी वाहिनीवरील मालिकांमधील कलाकार आणि काही राजकीय व्यक्तिमत्वही बिग बॉसच्या घरात पाहायला मिळणार आहेत. मात्र ज्या नावांची चर्चा सुरु आहे त्यांपैकी नक्की कोणते कलाकार पाहायला मिळतील हे तर शो सुरु झाल्यावरच कळेल. तर हा शो सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरु होणार असल्याची माहिती मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या:

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.