InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘तो परत येतोय’; लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘बिग बॉस मराठी’

महेश मांजरेकर यांनी सूत्रसंचालक केलेल्या ‘बिग बॉस’ कार्यक्रमाला राज्यभरातील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल. तेव्हाच ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वाची चर्चा रंगली होती. अखेर दुसरं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘तो परत येतोय’ म्हणत या कार्यक्रमाचा नवीन लोगो प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वाचे सूत्रसंचालन कोण करणार हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. त्याचप्रमाणे यामध्ये स्पर्धक कोण असतील याचीही उत्सुकता आहे. पहिल्या पर्वात अभिनेत्री मेघा धाडे या पर्वाची विजेती ठरली होती.

महत्त्वाच्या बातम्या –

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.