InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

मेंदूज्वर आजाराने बिहार त्रस्त; मुख्यमंत्र्याच्या विरोधात केली जनहित याचिका दाखल

- Advertisement -

बिहारमधील मुझफ्फरपूर आणि आसपासच्या परिसरात मेंदुज्वर (एईएस) या आजाराने थैमान घातले आहे. आतापर्यंत १०० हून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, लहान मुलांना ग्रासलेल्या या आजाराला रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात उदासीनता दाखवल्याचा आरोप करत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

- Advertisement -

या याचिकेमध्ये केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन, आरोग्य राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबै आणि बिहारचे आरोग्यमंत्री मंगल पांडेय यांचे नावही आहे. या प्रकरणाची सुनावणी २६ जून रोजी होणार आहे.

दरम्यान, बिहारमधील मुजफ्फरपूरमध्ये मेंदूज्वरामुळे आतापर्यंत 108 मुलांचा मृत्यू झाला आहे. या आजाराने एवढे थैमान घातले असताना नितीशकुमार 18 दिवस उलटले तरीही मुजफ्फरपूरच्या दौऱ्यावर न आल्याने यापूर्वी विरोधकांनीही त्यांना लक्ष्य केले होते. तसेच काळे झेंडे दाखवत चले जावचे नारे दिले गेले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.