InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

पिंपरीमध्ये भाजप नागरसेविकेचा विनय भंग

पिंपरीमध्ये भाजपच्या एका नगरसेविकेने तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. विनयभंग करणाऱ्याने मला जीवे मारण्याचाही प्रयत्न केल्याचे या नगरसेविकेने म्हटले आहे. हा प्रकार शुक्रवारी निगडीमधल्या भक्ती-शक्ती चौकात घडला. पोलिसांनी या प्रकरणी अशोक काळे(वय-51 वर्ष) या आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या नगसेविकेने काही लोकांविरोधात तक्रार केली होती. ज्या लोकांविरोधात नगरसेविकेने तक्रार केली होती त्यातल्या एकाच्या साथीदाराने म्हणजेच अशोक काळेने या नगरसेविकेच्या गाडीच्या पुढे त्याची फॉर्च्युनर आडवी घातली. यानंतर आरोपीने नगरसेविकेला धक्काबुक्की करत तिचा विनयभंग केला असे तक्रारीत म्हटले आहे. या नगरसेविकेला जमिनीवर आडवे पाडून तिच्या अंगावर गाडी घालण्याचाही प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. निगडी पोलिसांत या घटनेची तक्रार नोंदवण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply