InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Loading...

दिवंगत अभिनेत्री ‘मधुबाला’वर बायोपिक लवकरच…

 टीम महाराष्ट्र देशा : बॉलिवुडमध्ये सध्या बायोपिकचा ट्रेंड सुरु आहे. त्यात आता बॉलिवुड विश्वातील सदाबहार अभिनेत्री ‘मधुबाला’ यांचा जीवनपट चित्रपटाच्या भव्य पडद्यावर लवकरच झळकणार असल्याची बातमी मधुबाला यांची छोटी बहिण मधुर ब्रिज भूषण यांनी दिली.

मधुबाला यांची छोटी बहिण मधुर ब्रिज भूषण ही सुद्धा एक जबरदस्त अभिनेत्री आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने बॉलिवुडमध्ये आपले स्थान निर्माण केले. त्यामुळे मधुबालाच्या निधनानंतर तिला त्यावेळी टॉप असणाऱ्या डायरेक्टर्स-प्रोड्युसर्सनी अनेकदा ऑफर दिली की, मधुबालावरील चित्रपटाचे हक्क द्यावेत. पण, ब्रिज भूषणने कोणाचे ऐकले नाही. त्यामुळे मधुबालावरील बायोपिक बनलेच नाही.

Loading...

दरम्यान, ब्रिज भूषणने मधुबालावर बनणाऱ्या चित्रपटाचे राईट्स एका प्रोड्युसरला दिले आहेत. मात्र, हा प्रोड्युसर नेमका कोण याबाबत गुप्तता बाळगली आहे. ब्रिज भूषण म्हणाल्या की, माझे काही मित्र लवकरच ही बायोपिक प्रोड्यूस करतील. बायोपिकमध्ये मधुबालाच्या जीवनात आलेले अनेक उतार- चढाव बघायला मिळतील. मधुबालाच्या जीवनातील बहुतेक गुपिते बायोपिकमध्ये उघडली जातील. ‘मुगल-ए-आझम’, ‘चलती का नाम गाडी’, ‘मिस्टर आणि मिसेस 55’, ‘महल’ असे हिट सिनेमे मधुबालाच्या नावावर आहे. मधुबालाची भूमिका कोण साकारेल याबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

पण, मधुबालाचे चाहते, बॉलिवुडशी संबंधीत सर्व लोक या सर्वांना माझी एकच विनंती आहे की, कृपा करून माझ्या अनुमतीशिवाय कोणीही मधुबालाच्या जीवनावर बायोपिक किंवा इतर काही बनविण्याचा प्रयत्न करू नये.

- Advertisement -

मराठी सिनेसृष्टीतील उगवता तारा …नितीन बनसोडे

ऋषी कपूरच्या बहुचर्चित ‘मुल्क’ चा ट्रेलर रिलीज

Loading...
You might also like
Loading...

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.