Bipasha Basu | आलिया भटच्या पाठोपाठ बिपाशा बसू ही लवकरच देणार गुडन्यूज

मुंबई: बॉलीवूड (Bollywood) अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) हिने एका गोंडस लक्ष्मीला जन्म दिला आहे. काल सकाळीच आलियाला मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरीसाठी भरती करण्यात आले होते. आलियाने काल आपल्या पहिल्या आपत्याला जन्म दिला आहे. भट आणि कपूर कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. तर, या बातमीने आली आणि रणबीरचे चाहते देखील आनंदात आहे. आलिया पाठोपाठ बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu) ही तिच्या बाळासाठी अतुल असल्याची दिसत आहे.

बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बासू आणि अभिनेता करण सिंग ग्रोवर (Karan Singh Grover) लवकरच आई-वडील होणार आहेत. बिपाशा बासू हिने तिच्या मॅटरनिटी शूटचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. बिपाशा बासूने तिचे बेबी बंप फ्लाट करत एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. बिपाशा बासू आणि करण ग्रोव्हरचा हा व्हिडिओ चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. बिपाशाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांकडून त्याची प्रशंसा होत आहे.

बिपाशाने शेअर केलेल्या या व्हिडिओला तिने कॅप्शन दिले आहे,”बेबी ऑन द वे.” तर चाहत्यांनीही तिच्या या पोस्टवर कमेंट करत म्हटले आहे की, आम्ही तुमच्या बाळासाठी आतुर आहोत. आता आलियाप्रमाणेच बिपाशाही लवकर गुड न्यूज देण्याच्या तयारीत आहे.

बॉलीवूडमध्ये गेल्या वर्षभरात अनेक अभिनेत्रींनी गोड बातमी दिली आहे. यामध्ये अभिनेत्री प्रियंका चोपडाने मालतीच्या माध्यमातून तर अभिनेत्री सोनम कपूर हिने वायूच्या माध्यमातून गोड बातमी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.