InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

बिरसा मुंडा जयंतीला राष्ट्रीय सुट्टी घोषित करावी – शरद पवार

शरद पवार दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आले होते. अनेक क्षेत्रात आदिवासी विकासाच्या रस्त्यावर मागे असल्याने यावर लक्ष देण्याची गरज असल्याचे पवार यावेळी म्हणाले. तसेच या देशाचे मूळ निवासी आदिवासी आहेत. त्यांना मूळ निवासी घोषित करण्याची मागणी आपल्या देशासह संयुक्त राष्ट्रात देखील झाली पाहिजे असेही पवारांनी यावेळी मागणी केली.

दरम्यान बीरसा मुंडा जयंती म्हणजेच 15 नोव्हेंबरला राष्ट्रीय सुट्टी घोषित करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. बिरसा मुंडा जयंतीच्या निमित्ताने नागपूरात ‘आदिवासी शिक्षा व अधिकार परिषदेचे’ आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शरद पवार प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

Loading...

नागपूरच्या मेकोसाबाग येथील मैदानात पार पडलेल्या या कार्यक्रमात काँग्रेसचे आमदार नितीन राऊत, विकास ठाकरे, सुनील केदार यांच्यासह अनेक नेतेही एकाच मंचावर एकत्र आले होते

- Advertisement -

 

Loading...
You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.