Bisleri | बिसलेरीच्या बॉटलवर असेल आता ‘TATA’ चे नाव, 7 हजार कोटींमध्ये घेतला ब्रँड विकत

टाटा मोटर्स (Tata Motors), टाटा नमक (Tata Salt) हे ब्रँड्स जगभरात प्रसिद्ध आहेत. अशात टाटाचे अजून एक ब्रँड बाजारात उपलब्ध होणार आहे. ते म्हणजे टाटा पाणी (Tata Water). कारण बाटलीबंद पाण्यातला सर्वात मोठा ब्रँड बिसलेरी (Bisleri) आता टाटा समूहाकडे आला आहे. टाटा कंपनीने बिसलेरी हा ब्रँड विकत घेतला आहे. तब्बल सात हजार कोटी रुपयांमध्ये टाटांनी बिसलेरी आपल्या नावावर केला आहे.

उद्योजक रमेश चव्हाण (Ramesh Chouhan) यांच्या अध्यक्षतेखाली बिसलेरी हा ब्रँड भारतामध्ये प्रसिद्ध झाला होता. आता टाटा समूहाने तब्बल सात कोटी रुपयांमध्ये हा ब्रँड विकत घेतला आहे. रमेश चव्हाण म्हणाले की,”टाटा समूह या ब्रँडची काळजी चांगली घेईल. हा निर्णय घेणे माझ्यासाठी खूप वेदनादायक होते. टाटाबरोबरच मी हा ब्रँड ‘रिलायन्स रिटेल’ आणि ‘नेस्ले’ कंपन्यांना देखील देण्याचा प्रयत्न केला होता. तर दोन वर्षापासून टाटा समूहासोबत हा ब्रँड विकण्याची चर्चा सुरू होती. काही महिन्यापूर्वीच टाटा सन्सचे अध्यक्ष एस चंद्रशेखर आणि टाटा कन्स्युमरची सीईओ सुनील डिसूजा यांची भेट घेऊन हा निर्णय घेतला आहे.”

बिसलेरी हा मूळचा इटालियन ब्रँड होता ज्याने 1965 मध्ये मुंबईत एक छोटे दुकान सुरू केले होते. 1989 मध्ये रमेश चव्हाण यांनी ते दुकान मिळवले. रमेश चव्हाण यांनी तीस वर्षांपूर्वी थम्सअप (Thumps Up), गोल्ड स्पॉट (Gold Spot), लिमका (Limca) हे कोल्ड्रिंक्स ब्रँड अमेरिकन कंपनी कोको कोला (Coco Cola) ला विकले होते.

बिसलेरी हा ब्रँड बाटलीबंद पाण्यातील सर्वात मोठा ब्रँड म्हणून ओळखला जातो. बिसलेरीची सुरुवात फार्मासिटिकल कंपनी म्हणून झाली होती. इटालियन व्यापारी कंपनीचे संस्थापक फेलिस बिसलेरी पहिले मलेरिया औषधी विकायचे. फेलिस बिसलेरी यांच्यानंतर त्यांच्या फॅमिली डॉक्टर रॉसी यांनी बिसलेरीला पुढे नेले. 1989 मध्ये रमेश चव्हाण यांनी अवघ्या चार लाख रुपयांमध्ये बिसलेरी विकत घेतली होती. तेव्हापासून बिसलेरीची मालिके रमेश चव्हाण यांच्याकडे आहे. सध्या रमेश चव्हाण हे ८२ वर्षाचे आहे. त्यामुळे त्यांच्याकडून आता व्यवसाय सांभाळल्या जात नाही. अशा परिस्थितीत त्यांची मुलगी जयंती हिला व्यवसायात रस नाही. त्यामुळे रमेश चव्हाण यांनी हा व्यवसाय विकण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.