BJP | “इटालियन पिझ्झाने…” ; शरद पवारांचा VIDEO ट्वीट करत भातखळकरांची राहुल गांधींवर टीका

BJP on Rahul Gandhi | मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी विनायक दामोदर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात राजकारण पेटले आहे. भाजप नेते राहुल गांधींवर टीका देखील करत आहेत. महाराष्ट्रात काँग्रेसचा मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेने देखील राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर सहमत नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे भाजपलाही काँग्रेसवर हल्लाबोल करण्याची संधी मिळाली आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी शरद पवारांचा (Sharad Pawar) एक व्हिडीओ ट्वीट करत राहुल गांधींवर टीका केली आहे.

अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar)  म्हणाले, “बाकी कोणाचं नको पण आपल्याच महाविकास आघाडीतील ज्येष्ठ सहकारी व मार्गदर्शक शरद पवार साहेब यांचे स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील विचार तरी इटालियन पिझ्झाने ऐकावेत.”

काय आहे व्हिडीओमध्ये- 

शरद पवारांचा जुना व्हिडीओ भातखळकर यांनी शेअर केला. या व्हिडीओमध्ये शरद पवार यांनी वीर सावरकर यांची स्तुती केली आहे. सावरकर यांनी वयाच्या १८ वर्षी स्वातंत्र्य संग्रामात स्वत:ला झोकून देण्याची धाडसी भुमिका घेतल्याचे शरद पवार म्हणाले.

राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल-

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्ष बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) च्या वतीने वंदना सुहास डोंगरे यांनी वीर सावरकरांवर केलेल्या वक्तव्याबद्दल राहुल गांधींविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आपल्या तक्रारीत ‘स्वातंत्र्यसैनिकाची बदनामी आणि स्थानिक लोकांच्या भावना दुखावल्या’प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी भादंवि कलम ५०० आणि ५०१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

काय म्हणाले होते राहुल गांधी-

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी म्हणाले की, वीर सावरकरांनी इंग्रजांना पत्र लिहिले की, “मै आपका नौकर रहना चाहता हु” आणि त्यावर स्वाक्षरी केली. सावरकरांनी इंग्रजांना मदत केली. त्यांनी महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि सरदार पटेल यांच्यासारख्या नेत्यांचा पत्रावर सही करून विश्वासघात केला.

महत्वाच्या बातम्या : 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.