BJP | “एकनाथ शिंदे यांनी आधीच हात दाखवला आहे, तो कुणाच्या गालावर…”, भाजपच्या ‘या’ नेत्याचं ठाकरेंना प्रत्युत्तर

BJP | मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही दिवसांपुर्वी शिर्डी दौऱ्यावर होते. यावेळी ते ज्योतिषांकडे गेले होते. यावरुन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदेंवर निशाणा साधला. यालाच आता भाजप (BJP) पक्षाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

यावेळी, एकनाथ शिंदे यांनी आधीच हात दाखवला आहे. तो कुणाच्या गालावर आणि कुणाच्या पाठीवर पडलाय हे सांगायची गरज नाही, असे खडेबोल विखे पाटील यांनी सुनावले आहेत. तसेच, ते राज्याचे मुख्यमंत्री झाले हे त्यांचे भविष्य होतं. जनतेने राज्यातील भविष्य ठरवलेलं आहे. पुढची 20 वर्ष शिंदे-फडणवीस सरकारच राज्यात सत्तेत राहील, असा दावा देखील त्यांनी केला आहे.

यादरम्यान, उद्धव ठाकरे हे एका पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांनी बोलताना भान ठेवायला हवे. सत्ता गेल्याने त्यांचा थयथयाट आणि चिडचिड होतेय. मात्र वाचाळपणा कराल तर एकटे पडाल, असा टोला पाटलांनी लगावला आहे.

दरम्यान, अडिच वर्षे सत्तेत असताना आपल्याला शेतकऱ्यांची आठवण झाली नाही. आपण दिलेल्या घोषणांची सत्तेत असताना पूर्तता केली नाही. देवेंद्र फडणवीस यांनी वीज कनेक्शन तोडू नये, असं म्हणत आपण जे बोलतोय त्याचे भान त्यांना नाहीये, असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.