BJP | “छत्रपतींनी पाच वेळा औरंगजेबाची माफी मागितली”; भाजपा नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

BJP | मुंबई : अनेक नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सध्या राजकीय वातावरण तापलेलं आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर ब्रिटिशांकडून पेन्शन घ्यायचे, त्यांनी ब्रिटिशांची माफी मागितली होती, असं विधान केलं. त्यावरून वाद चालू असताना सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी “एका महिलेसाठी नेहरूंनी देशाची फाळणी केली”, असं वक्तव्य केलं.

हे वाद ताजे असतानाच आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात बोलताना थेट छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं. यावर प्रतिक्रिया येत असतानाच आता भारतीय जनता पार्टीचे (BJP) प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

त्यांनी केलेल्या या वक्तव्याचा व्हिडीओ सध्या  माध्यमांवर चर्चेत आहे. भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी एका हिंदी वृत्त वाहिनीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर आपली बाजू मांडताना  वक्तव्य केलं आहे.

“सावकरांनी ब्रिटीशांची माफी मागितली होती, असं सांगण्याचा प्रयत्न राहुल गांधींनी केला. त्या काळात अनेक लोकं प्रस्तावित फॉरमॅटमधून (Prescribed Format) बाहेर निघण्यासाठी माफी मागायचे. छत्रपती शिवाजी महाराजांनीदेखील पाचवेळा औरंगजेबाला पत्र लिहिलं होतं. मग याचा अर्थ काय झाला? पण सावकरांनी ब्रिटीश संविधानाची शपथ तरी घेतली नव्हती” असं वक्तव्य त्रिवेदी यांनी केलंय. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यावर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.