BJP | जगाला खरं कळेल तेव्हा पवारसाहेब अजित पवारांना पक्षात ठेवणार नाहीत; भाजप नेत्याचा विश्वास

BJP | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी तीन वर्षांपूर्वी अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या झालेल्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट केला होता. हा विषय  सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. यावरुन आता भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचे सुपुत्र निलेश राणे (Nilesh Rane) यांनी अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर टीका केली आहे.

“पहाटेचा शपथविधी जर पवार साहेबांची खेळी होती तर खासदार सुळे या कॅमेरासमोर ‘माझं घर तुटतंय’ सांगून का रडल्या?? फडणवीस साहेबांचा मनाचा मोठेपण आहे की त्यांनी अजित पवारांची इज्जत रस्त्यावर काढली नाही, ज्या दिवशी जगाला खरं कळेल पवार साहेब एक दिवस अजित पवारांना पक्षात ठेवणार नाहीत.” असे निलेश राणे यांनी ट्विट केले आहे.

जयंत पाटलांचं वक्तव्य

‘अजित पवारांनी भल्या सकाळी देवेंद्र फडणवीसांसह शपथ घेतल्यामुळेच राज्यातील राष्ट्रपती राजवट उठवण्यात आली’ अशा अर्थाचे वक्तव्य जयंत पाटलांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमधील नेतेमंडळींनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. अनेकांनी हा चर्चेच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीवर टीका केली आहे.

जयंत पाटलांच्या वक्तव्यानंतर राज्यात पुन्हा एकदा तर्क-वितर्कांना उधाण आले असून हा सगळा प्रकार शरद पवारांच्या खेळीचा भाग असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर जालन्यामध्ये पत्रकारांनी अजित पवारांना याबाबत विचारले असता त्यांनी यावर पुन्हा एकदा सविस्तर प्रतिक्रिया देणे टाळल्याचे पाहायला मिळत आहे. “त्यावेळी मी स्वत: म्हटलं होतं की तो विषय मी कदापि काढणार नाही”, असे अजित पवार म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed.