BJP | “देवेंद्र फडणवीसांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न झाला याचा साक्षीदार मी”; कोण म्हणलं?
BJP | मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच्या ठाकरे सरकारवर केलेल्या आरोपांची जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. “महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता”, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.
महाविकास आघाडीकडून हे आरोप फेटाळण्यात आले आहेत. फडणवीसांचे हे आरोप फेटाळत राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी खोचक प्रतिक्रिया दिली. सुप्रिया सुळेंनी दिलेल्या प्रतिक्रियेवर आज आशिष शेलार यांनी टीकास्र सोडलं आहे.
“देवेंद्र फडणवीसांच्या अटकेचा कट हा शरद पवार यांनीच रचला होता” असा आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. या आरोपांना दुजोरा देत मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनीही यावर आज भाष्य केलं.
“भाजपावर आरोप करणाऱ्यांनी तोंड बंद करावीत. अन्यथा देवेंद्र फडणवीस यांना अडकवण्याचा प्रयत्न नेमकं कोण करत होतं, ते मी नावासहित उघड करेन”, असा इशारा आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी दिला आहे.
ते म्हणाले, “महाविकास आघाडी सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न झाला. त्याचा साक्षीदार मी आहे. तत्कालीन पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी त्यांच्या खासगी जागेत 250 पानांचा रिपोर्ट ठेवला होता. त्यानंतर तो सार्वजनिक ठिकाणी आणला. तो रिपोर्ट मी स्वतः वाचला आहे.त्या रिपोर्टमध्ये कोणत्या पानावर देवेंद्र फडणवीस यांचं नाव लिहिण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता, हे मी पाहिलं होतं.”
महत्वाच्या बातम्या :
- Jayant Patil | “‘पहाटेचा शपथविधी ही शरद पवारांची खेळी होती’ असं मी बोललो नाही” – जयंत पाटील
- Rohit Pawar | जयंत पाटील यांच्या पहाटेच्या शपथविधीच्या ‘त्या’ विधानावर रोहित पवार म्हणाले…
- Chandrakant Patil | जयंत पाटलांच्या शपथविधी बाबतच्या वक्तव्यावरुन चंद्रकांत पाटील म्हणाले, “असे गौप्यस्फोट…”
- Ashish Shelar | “तोंड बंद करा, नाहीतर मी नावासहित सांगेन की…”; आशिष शेलारांचा इशारा काय?
- Nana Patole | “पोटनिवडणुका बिनविरोध करण्याची काँग्रेसची परंपरा भाजपने मोडली”; नाना पटोलेंची भाजपवर टीका
Comments are closed.