BJP | “पक्षांतर्गत गटबाजीला वैतागलो म्हणून…”; भाजपच्या माजी शहराध्यक्षांचा गौप्यस्फोट

BJP | सोलापूर: काल (21 मे) सोलापूर शहरामध्ये काँग्रेसचा निर्धार मेळावा पार पडला. यावेळी भाजपच्या माजी शहराध्यक्षांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याचबरोबर त्यांनी यावेळी भाजपबद्दल मोठे खुलासे केले. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

भाजप (BJP) चे माजी शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी (Ashok Nimbargi) यांनी काल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी बोलत असताना त्यांनी भाजपवर टीकास्त्र चालवलं आहे. बोलताना ते म्हणाले,”आता भाजपची विचारधारा बदलली आहे. आम्ही माजी प्रधानमंत्री अटल बिहारी बाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या विचारांना प्रेरित होऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, आता आम्हाला त्यांचे विचार भाजपमध्ये शोधूनही सापडत नाही. पक्षांतर्गत गटबाजीमुळे मी पक्ष सोडला. त्याचबरोबर पक्षातील अनेकजण याला वैतागले आहेत.”

पुढे बोलताना ते म्हणाले, “भाजप (BJP) चा वचननामा कसा तयार होतो हे आता आम्हाला चांगलंच कळलं आहे. भाजप वचननामाच्या माध्यमातून नेहमी लोकांना वेड्यात काढायचं काम करतात. निवडणूक होईपर्यंत नाही शब्द वापरायचा नाही. कुणी चंद्र मागत असेल तरी त्याला निवडून होईपर्यंत देतोच म्हणायचं, अशी भाजपची रणनीती आहे.”

“भाजप (BJP) मध्ये असताना असे वचननामे आम्ही वरिष्ठांच्या सांगण्यावरून तयार करायचो. मात्र, या सगळ्या गोष्टींना वैतागून मी भारतीय जनता पक्ष सोडला आहे, असं देखील ते यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3ITZ2BV