BJP | भाजपला धक्का! मुरजी पटेल यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप
मुंबई : अंधेरी पोट निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग येत आहे. रमेश लटके यांच्या निधनानंतर या निवडणुका होत असून त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके महाविकास आघाडीला पाठिंबा देत आहेत. त्यामुळे त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजेच मशालच्या उमेदवार होणार आहेत. मात्र, अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा वाद काही केल्या संपण्याचं नाव घेत नाहीये. अशातच भाजप पक्षाच्या वतीने अर्ज भरलेले मुरजी पटेल (Muraji Patel) यांच्या उमेदवारी अर्जावर उद्धव ठाकरे गटाकडून आक्षेप घेण्यात आला आहे.
मुंबईत येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. माजी नगरसेवक संदीप नाईक यांच्याकडून हा आक्षेप घेण्यात आला आहे. ‘मुरजी पटेल यांनी त्यांच्या गुन्ह्यांची माहिती लपवली’, असा आरोप संदीप नाईक यांनी केला आहे. सरकारच्या आदेशानुसार पालिकेने मुरजी पटेल यांना सहा वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे त्यांना निवडणूक लढवता येणार नाही. या निवडणुकीसाठी त्यांचा अर्ज कसा स्वीकारला, असा सवाल करत पटेलांविरोधात काही पुरावेही निवडणूक आयोगाला देणार असल्याचा दावा देखील संदीप नाईक यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी वाढवणारी गोष्ट म्हणजे ऋतुजा लटकेंविरोधात २४ उमेदवार रिंगणात आहेत, भाजपच्या मुरजी पटेल यांनी दोन अर्ज दाखल केले आहेत. एक अर्ज बाद ठरला, तर बाहेर फेकले जाण्याची नामुष्की टाळण्यासाठी खबरदारी म्हणून पटेल यांनी भाजपकडूनच दोन अर्ज भरले आहेत. तर ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही दोन अर्ज भरण्यात आले आहेत. दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके उमेदवार आहेत. पण सावधगिरी म्हणून संदीप नाईक यांचा अर्ज भरण्यात आला आहे.
दरम्यान, सर्व अर्जांची आज छाननी होणार आहे. सोमवार १७ ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. आलेल्या २५ अर्जांमधून आता किती उमेदवार माघार घेतात याची उत्सुकता आहे. या निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहेच. मात्र शिंदेंचं बंड आणि सत्तांतर यानंतर होणारी ही पहिलीच निवडणूक असल्याने संपूर्ण राज्याचं लक्ष याकडे लागलं आहे. आगामी मुंबई महापालिकेची समीकरणं यावर ठरतील. तसंच मतदारांचा कौलही समजणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Andheri Byelection | अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात ३ नोव्हेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर
- Travel Guide | ऋषिकेश ला फिरायला जाण्याचा प्लान करत आहात? तर ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या
- Raj Thackeray | राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंची भेट का घेतली?, जाणून घ्या सविस्तर
- Uddhav Thackeray। “…त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी गेम केला” ; शिंदे गटातील आमदाराचा गौप्यस्फोट
- Health Care Tips | झपाट्याने वजन वाढायचे असू शकते ‘हे’ कारण
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.