BJP | “भाजपाकडून भुंकण्यासाठी श्वानपथक नियुक्त, त्यांचा रिमोट…” ; कोणी केली टीका?

BJP | सांगली : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून सध्या राज्यातील राजकारण तापलेलं आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. या घटनेला आता सात दशकांहून जास्त काळ उलटला. मात्र, कर्नाटकसोबत असलेला सीमाप्रश्न अजूनही सुटलेला नाही. बेळगावमध्ये यावरून मोठा संघर्ष पाहायला मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष बैठक बोलावली होती.

या बैठकीत सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्याचा निकाल लागत नाही, तोपर्यंत सीमाभागातील गाांवर दावे करणारी विधाने करू नयेत, असा सल्ला गृहमंत्री शाह यांनी कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना दिला. यावरून आता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आतेबहिण कीर्ती पाठक यांनी भाजपावर निशाणा साधलाय.

भुंकण्यासाठी भाजपाकडून श्वान पथकाची नियुक्ती केली गेली असून काही अंतराने त्यातील एक जण भुंकतो. एक कोकणात भुंकतो तर एक मुंबईमध्ये भुंकतो आणि त्यांचा रिमोट दिल्लीत आहे. मुळात हे सर्व स्क्रिप्टेड असत अशी टीका कीर्ती पाठक (Kirti Pathak) यांनी केली.

स्वाभिमान या शब्दाचा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दूर पर्यंत संबध नाही. गद्दार हा शब्द त्यांच्या कपाळावर कायमचाच बसलेला आहे, असा घणाघात त्यांनी एकनाथ शिंदेंवर केला. राज्यपाल यांनी तर कहरच केला आहे. महाराष्ट्राचा इतिहास माहित नसलेल्या राज्यपालांना राज्यातून हाकलून दिले पाहिजे, असंही त्या म्हणाल्या.

पुढे त्या म्हणाल्या, “सीमाप्रश्नी गृहमंत्र्यांनी मध्यस्थी करण्याचा एक देखावा केला आहे. मध्यस्ती करत त्यातून उपाय सांगितला की, कोणीच कोणाच्या गावांवर दावा सांगयाचा नाही. पण, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतून शिवसेनेचा जन्म झाला. बेळगाव, कारवार आणि निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र हे शिवसेनेचं स्वप्न आहे. त्याच्यासाठी अनेक हुतात्मे झाले असून, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांनी त्याचा विसर पडू देता कामा नये.”

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed.