BJP | “मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्लात भाजपचे शक्तिप्रदर्शन म्हणजे सत्तेची खीर खाण्याचा डाव”

BJP | अकोला : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकील्ला असलेल्या ठाणे शहरात भाजपने केलेल्या शक्तिप्रदर्शनावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली. सिनेमाप्रमाणे सत्तेत राहून आपआपसात भांडत राहतात आणि लोकांना मुख्य मुद्द्यापासून विचलित करून सत्तेचा आनंद घेत आहेत. तर असाच प्रकार सध्या राज्यात पाहायला मिळत असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

सत्तेत बसलेले दोघेही हे लोकांना मूळ प्रश्नांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टींमध्ये आम्हाला पडायचे नाही जनता सज्ञान असून जनता या ईडीच्या भाजप सरकारला जागा दाखवून देईल. हे सरकार म्हणजे तुपाशी आणि जनता मात्र उपाशी, असं हे सरकार आहे, अशी टीका देखील नाना पटोले यांनी आजच्या भाजपच्या शक्तिप्रदर्शनावर केली आहे.

भाजपकडून ठाण्यात बाईक रॅली आणि मेळाव्यांचं आयोजन-

ठाण्यात भाजपकडून ठाण्यात बाईक रॅली आणि मेळाव्यांचं आयोजन करण्यात होते. खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाण्यात येऊन शक्तीप्रदर्शन केले. बावनकुळे यांनी पक्ष वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या.  ठाणे शहर दौऱ्यात भाजपा कार्यकर्त्यांनी जे.के. ग्राम ते खोपट पर्यंत काढलेल्या बाईक रॅलीत बावनकुळे सहभागी झाले होते.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.