BJP | “शिल्लकसेनेची युती म्हणजे ‘वंचित सोबत किंचित’”; भाजप नेत्याने शिवशक्ती-भीमशक्ती युतीची उडवली खिल्ली

BJP | मुंबई : शिवसेनेचे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीने युतीची घोषणा केली. यावरुन अनेकांनी या युतीवरुन टीका केली आहे.

“देशाची हुकूमशाहीकडे चाललेली वाटचाल रोखण्यासाठी, देश प्रथम हे उद्दिष्ट समोर ठेवून एकत्र येत आहोत”, असे दोन्ही नेत्यांकडून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 97व्या जयंतीदिनी जाहीर करण्यात आले. दरम्यान, या युतीवरून भाजपने जोरदार निशाणा साधला आहे. भाजप राज्याचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या युतीची खिल्ली उडवली आहे.

“प्रकाश आंबेडकर यांच्या ‘वंचित’सोबत उद्धव ठाकरे यांच्या शिल्लकसेनेची युती म्हणजे ‘वंचित’ सोबत ‘किंचित’” असे म्हणत केशव उपाध्ये यांनी या युतीची खिल्ली उडवली आहे. दरम्यान, शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीने राज्यातील महाविकास आघाडीची ताकद वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे विरोधकांकडून या युतीवरुन टीका-टिपण्णी केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या