BJP | सत्यजीत तांबेंना भाजपचा पाठिंबा?; प्रदेशाध्यक्ष बावनकुळे उद्या करणार जाहीर!
BJP | नाशिक : नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आलाय. काँग्रेससोबत दगाफटका केलेले अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांना भाजपचा पाठिंबा मिळणार की नाही याबाबत संभ्रम कायम होता मात्र आता भाजप सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी नाशिकच्या जिल्हाध्यक्षांशी यासंदर्भात चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातील भाजप जिल्हाध्यक्षांची या विषयावर ऑनलाईन चर्चा झाली. या चर्चेत सत्यजित तांबेंना पाठींबा देण्याचा झाल्याची माहिती समोर आली आहे.
उद्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचा नाशिक दौरा आहे. या दौऱ्यात भाजप अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत आता शुभांगी पाटील विरुद्ध सत्यजित तांबे अशी थेट लढत असेल. काँग्रेसला ऐनवेळी धोका देणाऱ्या सत्यजित तांबे यांना भाजपचा पाठिंबा असेल की नाही, याबाबत आजपर्यंत गुप्तता ठेवण्यात आली होती. मात्र आता भाजपने आपल्या हालचाली आता हळू हळू उघड करण्याचे ठरवले आहे.
महत्वाच्या बातम्या
- Prakash Ambedkar | MIM सोबतची युती का तुटली?; प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं कारण
- BJP | जगाला खरं कळेल तेव्हा पवारसाहेब अजित पवारांना पक्षात ठेवणार नाहीत; भाजप नेत्याचा विश्वास
- Ajit Pawar | पहाटेच्या थपथविधीबाबत जयंत पाटलांचा गौप्यस्फोट, त्यावर अजित पवार म्हणाले…
- Prakash Ambedkar | “सांभाळून बोलण्याचा सल्ला उद्धवजींनी दिला तर मानेल…”; प्रकाश आंबेडकर-राऊत यांच्यात जुंपली
- Prakash Ambedkar | “…तर आम्ही भाजपसोबतही युती करू”; आंबेडकरांचं खळबळजनक वक्तव्य
Comments are closed.