BJP | “शरद पवार शकुनीमामा पेक्षा पॉवरफुल आहेत का?”; भाजपच्या खासदारांचा जयंत पाटलांना खोचक सवाल

BJP | मुंबई :  महाराष्ट्र राज्यात राजकारणातील सर्वात मोठी खळबळ आणि आजही चर्चा होत असलेली घटना म्हणून 23 नोव्हेंबर 2019 च्या पहाटे राजभवनावर झालेला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या शपथविधीकडे पाहिल जाते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी याबाबत मोठा दावा केला.

शरद पवार यांनी पहाटेच्या शपथविधीची खेळी केल्याचा कयास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी बांधत राजकीय खेळी केल्याचे बोललं होतं. जयंत पाटलांच्या वक्तव्यानंतर राज्यात पुन्हा एकदा तर्क-वितर्कांना उधाण आले असून हा सगळा प्रकार शरद पवारांच्या खेळीचा भाग असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे.

जयंत पाटील यांनी केलेल्या विधानाचा संदर्भ देऊन भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “शरद पवार हे शकुनीमामा पेक्षा पॉवरफूल आहेत असं म्हणायचे आहे का?”, असा सवाल उपस्थित करत अनिल बोंडे यांनी टीका केली आहे.

जयंत पाटील यांचं स्पष्टीकरण

वक्तव्याबत जयंत पाटील यांनी यु-टर्न घेतल्याचं पाहायला मिळालं. जयंत पाटील म्हणाले, “पहाटेचा शपथविधी ही खेळी होती, असं मी बोललो नाही. तो एक अंदाज आहे. तो माझा कयास आहे. शरद पवार आम्हाला विचारून पावलं टाकत नाहीत. त्यांनी आम्हाला विचारून निर्णय घ्यावेत, असं आम्हाला अजिबात वाटत नाही. आम्ही फार ज्युनिअर आहोत. पण शरद पवारांनी एखादी गोष्ट केली तर त्याचा अर्थ कळण्यास बराच वेळ लागतो. त्यामुळे त्या काळातला घटनाक्रम बघितला तर, त्या घटनेचा फायदा नवीन सरकार स्थापन होण्यास झाला, हे नाकारून चालणार नाही. शरद पवारांनी ते जाणूनबुजून केलं, असं मी म्हणालो नाही. पण त्या घटनेचे फायदे काय झाले? हे मी त्यांना सांगत होतो”, असं म्हणत त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या :