InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Loading...

कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रात फोडाफोडीचा पॅटर्न रावबला जाऊ शकतो; संजय राऊत यांचा आरोप

कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रात फोडाफोडीचा पॅटर्न रावबला जाऊ शकतो, असा गंभीर आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे सकाळी पावणे दहा वाजता पत्रकार परिषद घेऊन भाजपवर निशाणा साधला.

राष्ट्रपती राजवटीच्याआड महाराष्ट्राला छळू नका, महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकणार नाही. असं सांगायलाही संजय राऊत विसरले नाहीत. राऊतांच्या या गंभीर आरोपांमुळे शिवसेना आणि भाजपमधील दुरावा वाढतच चालला आहे. परिणामी फक्त काही तास उरले असताना सत्तेचा तिढा कसा सुटणार हा प्रश्न आहे.

Loading...

शिवसेना अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावर ठाम असल्याची भूमिका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा बोलून दाखवली. त्यामुळे भाजपच्या नेत्यांकडे अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव असेल तरच त्यांनी मातोश्रीवर यावं, असं राऊतांनी नमूद केलं. शिवाय, पैसा आणि सत्तेचा वापर करुन कर्नाटक पॅटर्न महाराष्ट्रात राबवला जाऊ शकतो, असा आरोपही राऊतांनी केला. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यामागे भाजपचं षडयंत्र असल्याचा घणाघात राऊतांनी केला.

- Advertisement -

 

 

Loading...
You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.