InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

भाजप सरकार थापा मारून सत्तेवर आले आहे – शरद पवार

भारतातील जनतेला भूलथापा मारून भाजपचे सरकार सत्तेवर आले आहे. काँग्रेसने देशासाठी काहीच केले नाही असे म्हणणाऱ्यांनी गांधी घराण्याने स्वातंत्र्यासाठी दिलेले योगदान, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी देशासाठी दिलेले बलिदान याचा विसर मोदी सरकारला पडला आहे. त्यामुळे मोदींना असा प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकारच नाही असा हल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.

नोटाबंदी करून काळा पैसा परत काही आला नाही, अच्छे दिनची स्वप्न दाखवत सत्तेवर आले. जनता आता त्यांना जाब विचारत असल्याने मोदी सरकारची भाषा आता बदललेली आहे. अपयश लपवण्यासाठीच ते भारतातील नागरिकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी आता ते गांधी घराण्यावर निशाणा साधत आहेत, तसेच त्यांनी आता पुन्हा हिंदुत्वाचा मुद्दा पुढे केला असल्याची टीका पवार यांनी आपल्या खास शैलीत केली.

आज भारताने जी प्रगती केली आहे ती काही मोदी सरकारच्या पाच वर्षांत झालेली नाही, असे कोणी मानत असले तर तो त्यांचा मूर्खपणा ठरेल, असेही पवार यांनी स्पष्ट केले. रायगड लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांची प्रचारसभा अलिबाग येथील समुद्रकिनारी पार पडली. त्या सभेत पवार बोलत होते

महत्त्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.