InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

असुदूद्दीन औवेसी पिछाडीवर, भाजपचे भगवंत राव आघाडीवर

- Advertisement -

खासदार असुदूद्दीन औवेसी हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.या मतदारसंघात गेल्या तीन निवडणुकांपासून आसुदूद्दीन यांनी आपले खासदार पद कायम राखण्यात यश मिळवले आहे. मात्र, यंदाच्या निवडणुकीतील पहिल्या फेरीत ओवैसी पिछाडीवर गेले होते. हैदराबाद लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार डॉ. भगवंत राव आघाडीवर होते.

कोंग्रेसने हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून फिरोज खान यांना उमेदवारी दिली आहे. गतवर्षी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत आसुदूद्दीन औवेसी यांनी 513868 मते मिळवली होती. औवेसी यांनी भगवंत राव यांचा पराभव केला होता.  यंदाही येथून औवेसी यांचाच विजय निश्चित मानला जात आहे. मात्र, पहिल्या फेरीनंतर राव यांनी आघाडी घेत सर्वांनाच आश्चर्यचकित केले. मात्र, पुढच्या फेरीत औवेसी यांनी आघाडी घेतली असून औवेसी यांना 1,35,008 मते मिळाली आहेत. तर, भाजपाच्या भगवंत राव यांना 100814 मते मिळाली आहेत.

- Advertisement -

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.