InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

मागासवर्गीय समाजाच्या विकासाला युतीच्या काळात गती प्राप्त झाली – गिरीश बापट

पुणे लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. सोमवारी बापट यांनी कन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात प्रचारफेरी काढली.

यावेळी बापट म्हणाले की, युवकांना मुद्रा कर्जे, मेक इन इंडियाच्या माध्यामातून सव्वा लाख युवकांना स्वयंरोजगारासाठी उद्योजक होण्याची संधी दिली. उद्योगधंद्यांसाठी 15 कोटी, विद्यार्थ्यांना संशोधनासाठी 20 लाख रूपयांपर्यंतचे शैक्षणिक कर्ज, ह्रदयरोग, कॅन्सर अशा गंभीर आजारांसाठी मदत, जात पडताळणी जिल्हानिहाय समित्या, नोकरदार महिलांसाठी 50 तालुक्यांमध्ये वसतिगृह असे अनेक महत्त्वाचे निर्णय घेऊन, विकासाला चालना दिली असल्याचे गिरीश बापट म्हणाले.

मागासवर्गीय समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासाला युतीच्या काळात गती मिळाल्याचेही यावेळी गिरीश बापट म्हणाले.

या प्रचारफेरीत राज्यमंत्री दिलीप कांबळे, आरपीआय (ए) चे शहराध्यक्ष अशोक कांबळे, नगरसेवक उमेश गायकवाड, विवेक यादव, अतुल गायकवाड आदी उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या –

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.