InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

कार्यकर्ता हीच माझी ताकद आहे – गिरीश बापट

गिरीश बापट यांच्या समर्थनार्थ ताडीवाला रोड येथील महात्मा फुले शाळेच्या प्रांगणात भारतीय दलित कोब्रा संघटनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बापट म्हणाले की, गेल्या चाळीस वर्षांच्या राजकीय जीवनात जातीपातीचे गलिच्छ राजकारण मी कधीच केले नाही. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या जीवावर पाच वेळा आमदार व तीन वेळा नगरसेवक झालो. कार्यकर्ता हीच माझी ओळख आणि ताकद आहे.”

आमच्या सरकारने गरिबांच्या कल्याणाच्या अनेक योजना आणल्या, दुसरीकडे विरोधकांनी मात्र आजपर्यंत लोकांना खोटी आश्वासने दिली. सर्वसामान्यांची कामे करताना आम्ही कधी त्याची जातपात पहिली नाही.पण विरोधक मात्र माझ्या जातीवरून राजकारण करत आहेत. शेवटच्या श्वासापर्यंत गरिबांसाठी, कष्टकऱ्यांसाठी लढत राहीन हे वचन देतो, असे सांगत बेघरांना हक्काचे घर मिळवून दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही,, असेही बापट यावेळी म्हणाले.

यावेळी अँडव्होकेट भाई विवेक चव्हाण, नगरसेवक उमेश गायकवाड, दीपक पोटे, महेश लडकत, दीपक पोटे, श्रीपती सोनावणे, सुनील व्हगाडे, राहुल भोसले, राहुल बोराडे यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply