महापालिकेच्या मुख्यालयासमोरच रिचवली कचऱ्याची गाडी; भाजप नगरसेवकाचा घरचा आहेर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची घोषणा करून पाच वर्ष झालीत. मात्र शहराच्या पातळीवर यावर पाहिजे तसं काम होत नाही. सर्व देशात प्रसिद्ध असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्यालयात सत्ताधारी भाजपच्याच एका नगरसेवकाने प्रशासनाच्या विरोधात चक्क कचऱ्याचीच गाडी आणून ओतली. प्रशासन ठेकेदारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप या नगरसेवकाने केला. मात्र त्याविरुद्ध आंदोलन करत असताना त्यांनी स्वच्छ भारत अभिनयाचा कचरा केल्याची टीका होतेय.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आहे. पुण्यात कचऱ्याचा प्रश्न नवा नाही. मात्र आता पिंपरी-चिंचवडमध्येही कचऱ्याच्या अनेक समस्या निर्माण होताहेत. शहरातील कचरा उचलला जात नसल्याची तक्रार भाजपच्याच नगरसेवकांनी करत आंदोलनही केलंय. या आंदोलनामुळे काही काळ तणावही निर्माण झाला होता.

महत्वाच्या बातम्या-

Loading...
महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.