उत्पल पर्रिकरांचे तिकिट भाजपने कापले, गोव्यातील ३४ उमेदवारांची यादी जाहीर

मुंबई : गोवा विधानसभा निवडणुकीत सध्या सगळ्यात चर्चेचा विषय ठरला आहे, तो म्हणजे दिवंगत भाजप नेते मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना भाजपकडून तिकीट मिळणार की नाही. याबद्दल आता यावर चर्चा सुरु झाल्या आहेत. यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी थेट उत्पल पर्रीकर यांना निवडुण आणण्याची जबाबदारी घेतली आहे. यापुर्वीही राऊत यांनी उत्पल यांना शिवसेनेतुन निवडणूक लढवण्याची ऑफर दिली होती.

यानंतर आदमी पक्षाने देखील उत्पल पर्रीकर यांना उमेदवारी देण्याची ऑफर दिली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही उत्पल यांना पक्ष प्रवेशाची ऑफर देण्यात आली आहे. अन्यथा ते अपक्ष लढल्यास त्यांना पाठिंबा देण्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. गोव्यात ४० विधानसभा जागा आहेत. ज्यामध्ये भाजपने आपले आज ३४ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. भाजपने ३४ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

सध्या सर्वांचे लक्ष गोव्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रिकर यांना कोणत्या जागेचे तिकिट मिळणार याकडे आहे. आता जाहीर केलेल्या भाजपच्या यादीत उत्पल पर्रिकरांचे नाव नाही आहे. माहितीनुसार आज दुपारी एक वाजता उत्पल पर्रिकर भाजप यादी जाहीर करण्यासोबत त्यानंतर पत्रकारांशी बातचित करणार आहेत.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा