सुशांतच्या मृत्यू प्रकरणी भाजपकडून ‘या’ परदेशी महिलेच्या चौकशीची मागणी

सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सुझान वॉकर या परदेशी थेरपिस्टचे नाव समोर आले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सुशांतच्या मृत्यूचा निष्कर्ष काढला, असा आरोप भाजपने केला आहे. भाजप आमदार अॅड. आशिष शेलार यांनी यासंदर्भात ट्वीट केले आहे.

ठाकरे सरकारला उच्च न्यायालयाचा झटका ; बदलला ‘हा’ मोठा निर्णय

वॉकर यांनी सुशांतची माहिती कायद्याचे उल्लंघन करत मीडियाकडे उघड का केली असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला आहे. ‘सुझान वॉकर यांच्या म्हणण्यानुसार जर पोलीस म्हणत असतील की सुशांतने आत्महत्या केली आहे तर काही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत’, असा आरोप शेलार यांनी केला आहे. त्या परदेशी असताना भारतामध्ये मेंटल हेल्थ संदर्भात प्रॅक्टिस करण्याची परवानगी वॉकर यांच्याकडे आहे का, असा सवाल देखील शेलार यांनी उपस्थित केला आहे.

भाजपा नेत्यांना टार्गेट करण्यासाठी संजय राऊत यांचा पुन्हा शायराना अंदाज

वॉकर यांनी मेंटल हेल्थ कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना त्यांना पत्र देखील लिहिले आहे. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी लक्ष घालण्याची मागणी अॅड. आशिष शेलार यांनी या पत्राद्वारे केली आहे.सुझान वॉकर यांनी काही दिवसांपूर्वी अशी प्रतिक्रिया दिली होती की सुशांत नैराश्य आणि हायपोमेनियाशी  लढत होता. या काळात रिया त्याचा भक्कम आधार होती. त्यांनी काही माध्यमांना अशी माहिती दिली होती की सुशांतची परिस्थिती खूप गंभीर होती.

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.