InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

पक्षात येऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी भाजप दार बंद करत नाही- जावडेकर

- Advertisement -

पूर्वीची काँग्रेस ही देशाचा विचार करणारी होती. परंतु आताची काँग्रेस ही केवळ एकाच कुटुंबाचा विचार करणारी आहे. एका कुटुंबाच्याच स्वार्थामुळे आज काँग्रेसची दयनीय अवस्था झाली आहे, अशी घणाघाती टीका केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली. एका वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. यावेळी त्यांना कर्नाटकमधील घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर मध्य प्रदेश, राजस्थानातील सरकारबाबतही हेच होणार काय, अशी विचारणा झाली असता,  ते म्हणाले की, भाजप फोडाफोड करत नसल्याचे स्पष्ट करताना, येणाऱ्यांसाठी दारही बंद करत नसल्याचे सूचक उद्गार जावडेकर यांनी काढले.

पक्षात येऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी भाजप दार बंद करत नाही, असे सूचक उद्गार केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी काढल्याने महाराष्ट्रात आणि मध्य प्रदेश व राजस्थानमध्येही आगामी काळात काँग्रेस व इतर पक्षांतील नेते भाजपमध्ये येण्याचे संकेत मिळत आहेत.

Loading...

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या –

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.