InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘भाजपने मला आणि प्रणितीला ऑफर दिली होती’, सुशिलकुमार शिंदे यांचा गौप्यस्फोट

काँग्रेसचे नेते सुशिलकुमार शिंदे यांनी काल सोलापूर येथून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर काँग्रेसभवनमध्ये आयोजित सभेत बोलताना भाजपच्या कार्यपद्धतीवर त्यांनी टीका केली.

मला व मुलगी आमदार प्रणिती शिंदे यांना भाजपने ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेसभवनमध्ये बोलताना केला आहे.  आमच्या रक्तातच काँग्रेस आहे. जोपर्यंत जगू तोपर्यंत आम्ही काँग्रेसमध्येच राहणार आहोत. त्यामुळे आम्ही दोघांनीही भाजपच्या ऑफरला स्पष्टपणे नकार दिला असल्याचेही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply