‘भाजप नेत्यांची यादी देतो, त्यांच्यावर ईडी कारवाई करणार का?’, जयंत पाटलांचे आव्हान

अहमदनगर : गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीतील विविध नेत्यांना ईडीच्या नोटीस येतायत. यामध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख, प्रताप सरनाईक, हसन मुश्रीफ, अनिल परब, संजय राऊत, एकनाथ खडसे इत्यादी नेत्यांचा समावेश आहे. या पार्शभूमीवर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सुरू असलेल्या ईडीच्या कारवाईवरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.
भाजपमध्ये गेलेल्या लोकांना सीबीआय, ईडी आणि आयकर विभाग या एजन्सींचे संरक्षण आहे का? आम्ही अशा लोकांची यादी देतो त्यांच्यावर ईडी काय कारवाई करणार?, असा सवाल जयंत पाटील यांनी केला आहे. राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेसाठी जयंत पाटील अहमदनगर येथे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधताना हा सवाल केला.
पुढे पाटील म्हणाले, ‘महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाला बदनाम करण्यासाठी ईडी, सीबीआय व आयटी यंत्रणांना हाताशी धरून भाजप कारवाई करण्यास सांगत आहे. याचवेळी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांच्या गैरकारभाराकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. असे असेल तर आम्हीही अशा नेत्यांच्या आणि त्यांच्या गुन्ह्यांची माहिती देऊ, त्यांच्यावर या यंत्रणांनी कारवाई करून दाखवावी,’ असे आव्हान जयंत पाटील यांनी दिले.
महत्वाच्या बातम्या
- “संजय राऊत आणि नवज्योतसिंग सिद्धू म्हणजे जुळे भाऊ”
- ‘जर एखादं गटारातून बाहेर येत नाल्यात पडत असेल तर…’; कन्हैया कुमारच्या पक्षांतरावर भाजपची टीका
- …म्हणून मी शरद पवारांना कधीही जाणता राजा म्हणत नाही : सदाभाऊ खोत
- सिद्धूंच्या राजीनाम्यानंतर सोशल मीडियावर अर्चना पुरणसिंगचा ट्रेंड व्हायरल
- नवज्योत सिंग सिद्धू यांच्या राजीनाम्याबाबत मला काहीच माहिती नाही : चरणजीतसिंग चन्नी