InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

भाजप सरकार असंवेदनशील अमोल कोल्हेचा आरोप

- Advertisement -

राष्ट्रवादीकडून अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात शिवस्वराज्य यात्रा यवतमाळमध्ये काढण्यात आली. त्यावेळी त्यानी सरकारवर जोरदार टीका केली . शासन प्रत्येक गोष्टीत अपयशी ठरले आहे हे राज्यात महापूर आले तेव्हाच कळले. राज्यातील मंत्री असंवेदनशील वागत होते. जनतेचा कळवळा यांना नाही. सरकार फक्त मतांच्या गणितीसाठी प्रयत्न करत आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज यवतमाळ येथे केला.

यवतमाळ येथे पाच वर्षात एकही उद्योग आला नाही. राज्यातील महत्त्वाच्या कंपन्या बंद पडणार आहेत. लोकांचा रोजगार जाणार आहे. सरकारने जे स्वप्न दाखवले ते स्वप्न पूर्ण करण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. असा आरोपही अजित पवार यांनी केला.

- Advertisement -

यावेळी ते म्हणाले की, भाजपा सरकार सर्वच बाबतीत अपयशी ठरले आहे. त्यामुळे या सरकारला आता सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आतापासूनच कंबर कसून कामाला लागावे, असे प्रतिपादन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.