InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

कर्नाटकात सत्ता संघर्ष पेटवून भाजपा लोकशाहीचा खून करत आहे – धनंजय मुंडे

कर्नाटकातील सत्ता संघर्षाला नवीन वळण आले आहे. काँग्रेस-जनता दलाचे बंडखोर आमदार मुंबईतील पवई येथीस रेनेसन्स हॉटेलमध्ये थांबले आहेत. या बंडखोर आमदारांची मनधरणी करण्यासाठी काँग्रसचे ‘संकटमोचक’ म्हणून ओळखले जाणारे वरिष्ठ नेता डीके शिवकुमार मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र, ज्या हॉटेलमध्ये बंडखोर आमदार वास्तव्यास आहेत. त्या रेनेसन्स हॉटेलमध्ये डीके शिवकुमार यांना पोलिसांनी जाऊ दिले नाही. त्यामुळे येथील राजकीय वातावरण तापले आहे.

कर्नाटकातील सत्ता संघर्षावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले,’कर्नाटकात सत्ता संघर्ष पेटवून भाजपा लोकशाहीचा खून करत आहे. भाजपने कर्नाटकातील काँग्रेसच्या आमदारांना मुंबईत डांबून ठेवले आहे. महाराष्ट्रातील भाजपचे पदाधिकारीही खतपाणी घालत आहे. काँग्रेसच्या नेत्यांनाही आमदारांना भेटू दिले जात नाही. हा घोडेबाजार लोकशाहीला धरून नाही.’

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply