InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘गंगाधर ही शक्तीमान है’, भाजपचा राज ठाकरे- शरद पवारांना टोला

सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा काच हॉटेलमध्ये मुक्काम असल्याचे वृत्त येताच, यावर भाजपने ठाकरे आणि पवारांवर ट्विट करत टिका केली आहे.

‘कर्ता’ आणि ‘करविता’ यांनी एकत्र येणे अगदीच स्वाभाविक असून कारण “गंगाधर ही शक्तिमान है” हे अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. असा टोला भाजपने लगावला आहे.

सध्या राज ठाकरे हे आपल्या सभांमधून भाजप आणि नरेंद्र मोदींवर जोरदार टीका करत आहेत. सोलापूरमध्ये झालेल्या सभेनंतर राज ठाकरे  हॉटेल बालाजी सरोवर येथे आले. तसेच शरद पवार देखील उस्मानाबाद येथील सभा संपवून सोलापूरमधील बालाजी सरोवर या हॉटेलमध्ये पोहोचले. दोन्ही नेते एकत्र असल्याचे वृत्त झळकल्यावर, भाजपने ट्विट करत टीका केली.

महत्त्वाच्या बातम्या –

 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.